बुलढाणा: खाजगी बसने (ट्रॅव्हल) महामंडळाच्या एसटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली, तर सुमारे २५ प्रवासी जखमी झाले. मेहकर चिखली मार्गावर आज रविवारी( दि ४) ही दुर्घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “विरोधकांकडे विषय नसल्यामुळे आता कांद्यावर राजकारण,” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

हेही वाचा – नागपुरात ॲसिड हल्ला; प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले

राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा ते अहमदपूर बस ( एम.एच २० बीएल २३७७) आज बुलढाणा आगारातून रवाना झाली. दरम्यान मेहकर चिखली मार्गावर धावणाऱ्या एसटीला मागून भरधाव वेगाने येणारी एक लक्झरी बस धडकली. यामुळे अंजली गोपाल शर्मा ( २६, चिखली जिल्हा बुलढाणा) या महिलेचा मृत्यू झाला. २५ प्रवासी जखमी झाले आहेत. महामंडळाचे राहुल देशमाने, समाधान जुमडे, प्रविण तांगडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मेहकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रमेश बाजड, हवालदार शिवानंद केदार हे देखील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana woman died 25 injured in collision between luxury bus and st bus mehkar chikhli road accident scm 61 ssb