बुलढाणा : दूरवरच्या ओडिशा राज्यात शिक्षणासाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश स्थापना मिरवणुकीत उच्चदाबाचा विद्युत धक्का लागून वाहनातून खाली कोसळून तो दगावला. त्याचे काही सहकारी अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे. त्याचे पार्थिव आज, बुधवारी संध्याकाळी बुलढाण्यात दाखल होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोहम भगवान सावळे असे मृतक युवकाचे नाव असून तो बुलढाण्याचा मूळ रहिवासी आहे. ओडिशा राज्यातील कटक येथे तो योगामध्ये एमएससी करीत होता.  त्याच्या महाविद्यालयात गणेशाची मंगळवारी स्थापना करण्यात आली. त्यापूर्वी मिरवणूक काढण्यात आली.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Video-2023-09-20-at-2.14.44-PM.mp4

सोहम ट्रॅक्टरवर आपल्या काही सहकाऱ्यासह चढला होता. दरम्यान यावेळी  फडकविण्यात येणाऱ्या भगव्या ध्वजाचा (अल्युमिनियमचा) दांडा उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला लागला. यामुळे सोहमसह काही युवक खाली कोसळले. यात सोहम जागीच गतप्राण झाला. याची माहिती कळताच सावळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. कटक येथून त्याचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. आज संध्याकाळी उशिरा बुलढाण्यात दाखल झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.