बुलढाणा : जिल्हा प्रशासनाचे संनियंत्रण करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामासाठी जिल्ह्याभरातून दररोज हजारो नागरिक येतात. मात्र दुचाकीवरून येणाऱ्या नागरिकांनी हेल्मेट घातले असेल तरच त्यांना कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. होय! दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांनीच यासंदर्भातील आदेश जारी केले आहे.

या आशयाचे फलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच लावण्यात आले आहे. ३ जुलै पासून ही प्रवेशबंदी करण्यात आली. मात्र तरीही काही महाभाग आपली दुचाकी वाहने फलकाकडे दुर्लक्ष करून कार्यालयात नेत असल्याचे दिसून आले. यामुळे आता यासाठी दोन पोलीस दादांना याकामी तैनात करण्यात आले आहे. यामुळे आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची अडचण होत आहे. आज अनेकांना हेल्मेट नसल्याने परतावे लागले.

Story img Loader