लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बुलढाणा: सिंदखेडराजा येथे आज सोमवारी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी जन आंदोलन केले. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या लखोजी राजे जाधव राजवाडा येथे काही वेळ धरणे देण्यात आले. यानंतर राजवाडा ते सिंदखेडराजादरम्यान रणरणत्या उन्हात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
बळीराजा अगोदरच हवालदिल झाला आहे. यातच वन्य प्राण्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. वन्यप्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा आणि शेतीला कुंपनासाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन पाठविण्यात आले.
First published on: 29-05-2023 at 17:07 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullock cart protest by farmers in buldhana scm 61 dvr