वर्धा : राज्यातील अमरावती व नाशिक विभाग वगळून जनावरांवरील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पशुसंवर्धन खात्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे उर्वरित विभागात गोवंशीय पशुधनावरील विविध निर्बंध मोकळे करण्याची भूमिका पुढे आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चंद्रपूर : पेपर देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांची मधमाशांनीच घेतली ‘परीक्षा’, हल्ल्यात तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी

याच अनुषंगाने बैलगाडा शर्यत, पशुप्रदर्शनी, पशुमेळावे, म्हशींचा बाजार भरविणे, वाहतूक अशा बाबींना मोकळीक देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज हे कार्यक्रम करण्यास मुभा देण्याचा आदेश काढला आहे. जिल्हा वार्षिक योजना पूर्वीप्रमाणे कार्यान्वित होईल. गोजातीय पशूंचे गट करून कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. काही बाबी या ठराविक अटींची पूर्तता केल्यावर करता येणे शक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ एकोणपन्नास पशु लम्पी चर्मरोगाने बाधित आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullock cart race will be held in wardha district pmd 64 zws