नागपूर: महापारेषण या शासकीय वीज कंपनीत रिक्त असलेली सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) १ हजार ८६८ पदे आणि इतरही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. मुंबईच्या प्रकाशगंगा येथे सुगत गमरे संचालक (मासं) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची २६ जूनला बैठक झाली. याप्रसंगी सुधिर वानखेडे मुख्य महाव्यवस्थापक (मासं), राजू गायकवाड महाव्यवस्थापक (मासं) व मा.भरत पाटील मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने सरचिटणीस कृष्णा भोयर व उपाध्यक्ष भिमाशंकर पोहेकर उपस्थित होते. सुगंत गमरे म्हणाले, कंपनीमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) १८६८ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तंत्रज्ञ- १, २ व सिनिअर टेक्नीशियन सरळसेवा भरती करीता राखीव असलेली ६३२ पदेही भरण्याबाबत प्रक्रिया होईल. सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) ही पदे भरताना महावितरण प्रमाणे विद्युत व इतर सहाय्यक पदे जशी भरली त्याप्रमाणे ३ वर्षे कंत्राटी पद्धतीने मानधनावर भरण्याबाबतचे प्रयत्न आहे.

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?

हेही वाचा… अमरावती: कर्जाची चौपट परतफेड तरीही महिलेचे अश्लील फोटो प्रसारीत

सहाय्यक सामान्य तंत्रज्ञ ही पदे भरताना पारदर्शक पद्धतीने, लेखी स्वरुपाची तांत्रिक प्रश्न असलेली परीक्षा घेऊ. सहाय्यक सामान्य तंत्रज्ञ भरती करताना त्यांची शारीरिक तपासणी करण्याबाबतचा कंपनीचा मानस असल्याचेही ते म्हणाले. या भरतीबाबत संघटनेने आनंद व्यक्त केला. परंतु संघटनेने महावितरण कंपनी प्रमाणे सहाय्यक म्हणून मानधनावर पदे भरण्याची पद्धत पारेषण कंपनीमध्ये सुरू करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली. महावितरणमधील सहाय्यक भरतीची पद्धत सुरू केल्यामुळे त्याचे काय विपरीत परिणाम वितरण कंपनीती ल सहाय्यक कामगारावर झाले, हे सांगण्यात आले. त्यामुळे सहाय्यक भरतीला संघटनेचा विरोध असल्याचे स्पष्ट केल्याचे फेडरेशनचे कृष्णा भोयर यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. तंत्रज्ञ-१,२ व सिनियर टेक्निशियन या पदामध्ये १५% टक्के पदे ही खुल्या भरती करीता राखीव ठेवलेली आहे.

हेही वाचा… ग्रीन ब्रिगेडच्यावतीने यंदा १० हजार वृक्षांची लागवड; वाढत्या उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी संकल्प

त्यास संघटनेचा तीव्र विरोध असून अंतर्गत भरती करीता राखीव असलेली १० टक्के पदामध्ये खुल्या भरतीतील १५ टक्के पदाचा समावेश करू २५ टक्के पदे अंतर्गत भरतीद्वारे भरून कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही भोयर यांनी केली. आभा शुक्ला प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या समवेत दिनांक ११ जून २०२३ रोजी विविध प्रलंबित प्रश्नावर वर्कर्स फेडरेशन संमवेत झालेल्या बैठकी मध्ये महापारेषण कंपनीमध्ये रिक्त असलेली वर्ग १ ते ४ प्रवर्गातील सर्व पदे भरण्याची कारवाई तात्काळ करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळेस  तात्काळ सर्व रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाने सुरुवातीला २५ टक्के पदे भरण्याची जी भूमिका घेतली होती. त्यात बदल करून १०० टक्के पदे भरण्याचा निर्णय आमच्या संघटने समवेत झालेल्या बैठकीमुळेच घेतल्याचेही भोयर म्हणाले.

Story img Loader