नागपूर: मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंनी सोमवारी प्रचारादरम्यान भाजप कार्यालयात घेतलेली गळाभेट चांगलीच चर्चेत आहे. हे प्रकरण ताजे असतांनाच मंगळवारी मध्य नागपुरातील एका भागात डासांचा प्रकोप वाढल्याचा बंटी शेळकेंना फोन आला. त्यानंतर ते प्रचार सोडून थेट संबंधित ठिकाणी फाॅगिंग यंत्र घेऊन पोहचले आणि फवारणी सुरू केली.हा प्रकार बघून स्थानिक नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांचे गृह शहर नागपुरातील मध्य नागपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवीण दटकेंच्या प्रचार कार्यालयात सोमवारी  काँग्रेस उमेदवार बंटी शेळके अचानक  गेले. आत गेल्यावर त्यांनी तेथील भाजप कार्यकर्त्यांची गळाभेट घेतली. त्याची चर्चा शहरात आहे. त्यानंतर  मंगळवारी त्यांचा  आणखी एका व्हिडिओने शहरातील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा आहे.

हेही वाचा >>>मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…

 बंटी शेळके मंगळवारी सकाळपासून प्रचारात आहे. दुपारी काही वेळ ते कार्यकर्त्यांशी प्रचाराबाबत संध्याकाळचे नियोजन ठरवत होते. यावेळी निकालस मंदीर, इतवारीतील एका नगरिकाचा त्यांना फोन आला. त्यांच्या भागात डास वाढल्याने अनेक नागरिक आजारी पडत असल्याचे नागरिकाने सांगितले. त्यानंतर बंटी शेळके प्रचार  बैठक सोडून थेट संबंधित ठिकाणी फाॅगिग यंत्रासह पोहचले. येथे त्यांनी प्रथम स्थानिक नागरिकांशी संवाद साधत मग स्वत: फाॅगिंग यंत्र घेऊन किटकनाशकाची फवारणी सुरू केली. थेट मध्य नागपूरातील उमेदवारच नागपूर महापालिकेची जबाबदारी असलेले फाॅगिंगचे काम करत असल्याचे बघत स्थानिक नागरिकांनाही धक्काच बसला. हा व्हिडिओ बंटी शेळके यांनी स्वत: त्यांच्या विविध समाजमाध्यमांवर प्रसारीत केला. त्याला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावर अनेक नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या गेल्या.

हेही वाचा >>>काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…

दरम्यान हल्ली नागपूरसह राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. सर्व पक्षांसह अपक्ष उमेदवारही नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी, महायुती आणि इतर पक्षाच्या नेत्यांकडून आता पूर्ण ताकद लावली जात आहे. या काळातील निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच उमेदवार व नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. प्रत्येक जन प्रत्येक मिनटाला प्रचार, नागरिकांची मते कशी मिळणार याबाबत नियोजन करतांना दिसतो. त्यात बंटी शेळकेंच्या ही कृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 संदेशात काय लिहले..

बंटी शेळके यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारीत करत पोस्ट केली आहे.  डेंग्यूचा प्रकोप बघता, मी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. निवडणूक येत-जात राहतील, पण जनसेवा कायम राहील. आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं हेच माझं प्रथम कर्तव्य आहे. संकटाच्या काळात साथ देणं, मदतीचा हात पुढे करणं – हेच माझं काम आहे, आणि यापुढेही राहील. आपल्या सेवेच्या वचनासह. असे या पोस्टमध्ये नमुद केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bunty shelke arrived with a fogging machine due to the increase in mosquitoes nagpur news mnb 82 amy