बुलढाणा : राज्यात खळबळ निर्माण करणाऱ्या समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार असल्याचे वृत्त आहे.
अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, अधिकृत दौरा जाहीर झाला नाही. मात्र काही लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी अपघात स्थळाकडे रवाना झाले. पोलीस अधीक्षक अपघात स्थळी अगोदरच पोहोचले आहे. समृद्धीवरील ‘बेस कॅम्प’ हेलिपॅडवर ते दाखल होणार होते. मात्र ते लहान आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंदखेड राजाला येतील अशी चर्चा आहे. याशिवाय संभाजीनगरपर्यंत हेलिकॉप्टरने येऊन घटनास्थळी दाखल होतील, अशीही शक्यता आहे.