वर्धा : नागपूर मुंबई या खाजगी बसला सिंदखेडराजा येथे झालेल्या भीषण अपघातात पंचवीस लोकांचा मृत्यू झाला. या बसमध्ये वर्धा जिल्ह्यातील चौदा प्रवासी होते. त्यांची ओळख पटविणे सुरू आहे.
प्रवाशांमध्ये अवंती पोहनकर, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी सर्व रा. वर्धा, तसेच संजीवनी गोटे रा. अल्लीपूर ही नावे पुढे आली आहेत. त्यांची नेमकी स्थिती कळलेली नाही. वर्धेतून बसलेला एक प्रवासी हिमाचल प्रदेश येथील आहे. घटना कळताच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. इथे संपर्क साधण्याचे काम त्यांनी तपासले. तसेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्वरित अपघात स्थळी पाठविण्याचा निर्णय झाला.
हेही वाचा – बस अपघात: नागपूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी येथे संपर्क साधावा
पोलिसाचे पथक पहाटेच रवाना झाले. मृतांची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक पथकाची विचारणा बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून झाली. त्यांना योग्य तो संदर्भ देण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून नावांची माहिती देण्याघेण्यासाठी ८८८८२३९९०० हा क्रमांक प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे.