यवतमाळ : नागपूर – तुळजापूर महामार्ग महागाव व उमरखेड तालुक्यात प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या मार्गावर सातत्याने अपघात होत आहे. आज शनिवारी एसटी बसला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बस दरीत कोसळता कोसळता वाचली.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बस दरीत कोसळली नाही आणि ५० प्रवासी थोडक्यात बचावले. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास नांदगव्हाण घाटात ही घटना घडली. अपघातानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने एसटी बसला आधार देण्यात आला तेवढ्या वेळात प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगव्हाण घाटातील निर्माणाधीन पूल अपघातक्षेत्र बनले आहे. चार दिवसांत याठिकाणी हा तिसरा मोठा अपघात झाला आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

हेही वाचा – “विरोधकांकडे विषय नसल्यामुळे आता कांद्यावर राजकारण,” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

हदगाव (जि. नांदेड) येथून एसटी बस क्रमांक (एमएच २०/ बीएल १६०५) ही बस ५० प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास बसला नांदगव्हाण घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षक भिंतीत बस अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावून त्याच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

हेही वाचा – बुलढाणा : ‘लक्झरी’ व एसटीच्या धडकेत महिला ठार, २५ जखमी; मेहकर चिखली मार्गावरील दुर्घटना

विशेष म्हणजे मागील चार दिवसांतील नांदगव्हाण घाटातील हा तिसरा अपघात असून, दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता. त्यातील अपघातग्रस्त ट्रक अजूनही बाजूला करण्याचे सौजन्य महामार्ग पोलिसांनी दाखवलेले नाही आणि आज बसचा अपघात झाल्याने प्रवाशी भयभीत आहेत.

Story img Loader