नागपूर :  हिंगणा स्कूलबस अपघाताला सुमारे एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या अपघाताला जबाबदार असलेली खासगी बस आणि चालकावर कारवाईचा बडगा तीन आरटीओ कार्यालयांनी उगारला आहे. 

उपराजधानीतील शंकरनगरमधील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहलीला जात असताना भाड्याने घेतलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून २६ नोव्हेंबरला बस हिंगणा परिसरात उलटली. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमींवर नागपुरातील एम्स रुग्णालयात उपचार सुरू केले गेले. या प्रकरणात अपघातग्रस्त बसचा परवाना नसणे, अपघातानंतर बसची पीयूसी काढण्यात येणे, अपघातग्रस्त बसचा आपत्कालीन द्वार कायमचा बंद असणे, अशा अनेक त्रुटी पुढे आल्या होत्या.

Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Malkin Bai Written behind Car form Pune
प्रेम करावं तर पुणेकरांसारखं! मालकीणबाईसाठी काहीपण, Video Viral एकदा बघाच
case registered against Ferrari driver at revdanda police station zws
‘त्या’ फेरारी चालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Thief went to steal a scooter but left his own there funny video goes viral
स्कूटी चोरायला गेला आणि काहीतरी भलतंच केलं; VIDEO पाहून सांगा ‘या’ चोराला तुम्ही काय म्हणाल, हुशार का मुर्ख?
marathi actors visited prarthana behere new home in alibaug
प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अभिनेत्रीच्या अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समोर

हेही वाचा >>>नितेश राणेना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसचा सवाल

दरम्यान, आरटीओच्या विविध कार्यालयाशी संबंध असल्याने या प्रकरणात एकाच वेळी तीन आरटीओ कार्यालयांकडून संबंधित प्रकरणात नोटीस बजावण्यासह इतर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार शहर आरटीओ कार्यालयाने बस चालकाला वाहन चालवण्याचा परवाना निलंबनाची नोटीस बजावली. नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालायने बस मालकाला परवाना निलंबन का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली.  पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयाकडून पीयूसी केंद्राला त्यांचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी  नोटीस बजावण्यात आली.   समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयाने संबंधित पीयूसी केंद्राचा परवाना निलंबित करून यंत्र जप्त केले. शहर आरटीओने बस चालकाचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला तर नागपूर ग्रामीण आरटीओने बसची नोंदणी ९० दिवसांसाठी निलंबित केली. एकाच वेळी तिन्ही आरटीओंकडून कारवाई झाल्याने  परवानगी न घेता सहलीचे आयोजन करणाऱ्या खासगी बस चालकांचे धाबे दणाणले आहेत.

दोन विद्यार्थ्यांसह शिक्षिकेवर शस्त्रक्रिया

अपघातग्रस्त बसमधील एका विद्यार्थ्याच्या पोटाला गंभीर इजा झाली होती. तातडीने त्यावर शस्त्रक्रिया केली गेली.  एका विद्यार्थ्याच्या मूत्रपिंडावर शस्त्रक्रिया झाली. शिक्षिकेच्या पाठीच्या मनक्याला इजा असल्याने तिच्यावर   उपचार झाले.  इतरही जखमी विद्यार्थ्यांवर एम्समध्ये उपचार झाल्याची माहिती आहे.

Story img Loader