बुलढाणा: बुलढाण्यात आज रविवारी आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी एसटी महा मंडळाच्या ३४१ बसची सेवा घेण्यात आली.
बुलढाणा ते मलकापूर राज्यमार्गावरील कऱ्हाडे ले आऊट मध्ये हा जंगी शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी भव्य ‘ वॉटर प्रूफ’ शामियाना उभारण्यात आला आहे. याठिकाणी हजारो लाभार्थ्यांसाठी विशेष कक्ष ( कंपार्टमेंट) तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>स्वस्त धान्य दुकानातील ‘पॉस’ यंत्राचा इंटरनेट सेवेशी संबंध काय? वारंवार कां बंद पडते
जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना बुलढाण्यात आणण्यासाठी ३४१ बस ची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील ७ आगारातील या बस लाभधारकाना घेऊन आज रविवारी सकाळी १३ तालुक्यातून निघाल्या. आघाडीच्या रास्ता रोको मुळे थांबविण्यात आल्यावर बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांची ‘ सुटका’ करून लगेच बुलढाण्याकडे रवाना केले.