नागपूर: पहिल्या दोन टप्प्यातच विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघातील निवडणुका आटोपल्याने सध्या या भागात प्रचाराच्या अनुषंगाने वाढलेली आर्थिक उलाढाल मंदावली आहे. बेरोजगार तरुण, प्रचार सभेला माणसे पुरवणारे कंत्राटदार, वाहन पुरवठाधारक, मंडप टाकणारे, खाद्य पदार्थ पुरवठाधारक व तत्सम व्यवसायात मंदी आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विविध विकास संस्था असणे हीच नागपूर शहराची खरी समस्या -उच्च न्यायालय म्हणाले…

निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्ते हवे, सध्या कोणीही विनामोबदला काम करीत नाही. त्यामुळे प्रचार फेऱ्यांसाटी उमेदवाराला पाचशे ते हजार रुपये रोजाने अनेक माणसे आणावी लागतात. विदर्भात निवडणूक प्रचार काळात मोठ्या संख्येने बेरोजगार तरुणांना काम मिळाले होते. उमेदवारांचे पत्रके वाटणे, मतचिठ्ठ्यांचे वाटप करणे यासाठीही मनुष्यबळ भाड्यानेच घ्यावे लागत होते. यानिमित्ताने महिला,मुली, मुलांना काम मिळाले होतै.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगावर उच्च न्यायालयाची टीका, म्हणाले’ जनहिताबाबत चिंता नाही…’

कार्यकर्त्याची दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. यासाठी डब्बेवाले, छोटे खाणावळ चालक यांच्या व्यवसायात तेजी आली होती. राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी गावोगावी वाहने पाठवावी लागते. त्यातून येणाऱ्या माणसांना प्रतिदिवस पैसे द्यावे लागते ही रक्कम पाचशेपासून पुढे असते. जेवणाचाही खर्च करावा लागतो. ही कामे करणारे गावोगावी, तालक्याच्या ठिकाणी राजकीय पक्षातीलच कंत्राटदार असतात. विदर्भात पहिल्या दोन टप्प्यात निवडणुका झाल्याने सध्या त्यांशा काम नाही. पहिल्या टप्प्यात विदर्भात नागपूरसह पाच मतदारसंघात निवडणुका झाल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाच मतदारसंघात निवडणुका झाल्या. त्यामुळे पहिला टप्पा झाल्यावर अनेक कार्यकर्ते, कंत्राटदार, वाहन चालक, पुरवठाधारकांना पश्चिम विदर्भात निवडणूक काम मिळाले होतै. हे येथे उल्लेखनीय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Business related with elections slowdown after first two phases of poll zws 70 cwb