लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : गुजरातमधील रहिवासी असलेल्या बड्या व्यापाऱ्याचे विदर्भातील मलकापूर ( जिल्हा बुलढाणा ) येथून बुधवारी रात्री अपहरण करण्यात आले. पोलीस तपासात व्यापाऱ्याचे सिल्लोड ( जिल्हा संभाजीनगर ) येथील व्यापाऱ्यांनी अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याची पोलिसांनी सुटका केली.

एमआयडीसी मलकापूर पोलीस स्टेशन येथे संध्याकाळी आसिफ अलीभाई सर्वदी (वय ३१ राहणार तालुका कंकारा, जिल्हा मोरबी, गुजरात) त्याचे वडील अली भाई अकबर भाई (वय ५२) हे मलकापूर एमआयडीसीमधील अनंत कृपा पेपर मील येथे व्यवसायानिमित्त आले होते. यावेळी त्यांचे चार इसमानी अपहरण केले. काही वेळाने फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यावरून अज्ञात इसमांनी त्यांचे ५० लाखांसाठी अपहरण केल्याचे सांगितले.

आणखी वाचा-विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात देशभरातील संघटना नागपुरात येणार… हे आहे कारण…

मोबाईल आला कामी

या घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार हेमराज कोळी यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांना दिली. अली भाई अकबर भाई यांच्या मोबाईलचे ‘ लोकेशन’ घेण्यात आले. ते अंधारी (तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर ) येथील निघाले. यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या परवागीने अली यांचा शोध घेण्यासाठी विषेश पथक तयार करून सिल्लोडकडे रवाना करण्यात आले.

ग्रामीण पोलीसांची मदत घेवून अलीभाई अकबरभाई गुजरात यांचा अंधारी परिसरात शोध घेण्यात आला. यावेळी अलिभाई शेख मुश्ताक शेख इलियास (वय ३३), अनिस युसुफ पटेल (वय४६), व हक्कानी जिलानी पटेल (वय ३८), शेख शाहीद शेख सईद (वय ३२) ( सर्व राहणार अंधारी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांच्या ताब्यात असल्याचे दिसून आले. त्याची सुटका करण्यात आली. चार आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार हेमराज कोळी हे करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman resident of gujarat kidnapped from malkapur in vidarbha scm 61 mrj