लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: बायपास शस्त्रक्रिया झालेल्या ह्रदयरुग्णाला स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागते. याबाबत अनेक गैरसमजही आहेत. ते दूर करण्यासाठी नागपुरातील कार्डियन रुग्णालयाने रविवारी सकाळी ८ वाजता बायपास झालेल्या रुग्णांची वॉकथॉन आयोजित केली आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना कार्डियन रुग्णालयाचे संचालक व ज्येष्ठ ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. निकुंज पवार लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले, बायपास सर्जरी झाली असली तरी रुग्णाने डॉक्टरांच्या सल्याप्रमाणे काळजी घेतल्यास हा रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. हा संदेश देण्यासाठीच ही वॉकथॉन आहे.मी स्वत: १३ वर्षांपूर्वी बायपास केलेल्या व आता ९० वर्षे वय असलेला रुग्णही या ‘वॉकथॉन’मध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच बायपास सर्जरी झालेले मेडिकलचे माजी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, कवी सुधाकर गायधनी हे सुद्धा सहभागी होणार आहेत.

आणखी वाचा-कळमेश्वरच्या जंगलात सिंह पाहिल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल, अफवा पसरवणारा ताब्यात

नागपुरात प्रथमच अशा रुग्णांसाठी वॉकथॉनचे आयोजित करण्यात आले असून त्यात २०० रुग्ण व या क्षेत्रातील डॉक्टर- कर्मचारी, सामाजिक संघटनाही सहभागी होईल. वॉकथॉनचा शुभारंभ धंतोलीतील कार्डियन रुग्णालय परिसरातून होईल. त्यात सहभागी होणाऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणीही केली जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. इच्छुकांनी ०७१२- २४२४२४० आणि ९९२२६४६६६० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bypass heart patients will run in nagpur what is the activity mnb 82 mrj
Show comments