वर्धा : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सी ए परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून अहमदाबाद येथील अक्षय जैन हा देशात प्रथम आला आहे. त्याने ८०० पैकी ६१६ गुण प्राप्त केले आहे, तर सीए इंटर परीक्षेत हैद्राबाद येथील वाय गोकुळ साई श्रीकर याने ८०० पैकी ६८८ गुण प्राप्त करीत अव्वल क्रमांक गाठला.
सीए परीक्षेचा निकाल ८ . ३३ टक्के तर इंटरचा १०.२४ टक्के लागला आहे.अंतिम परीक्षेला देशात १.४० लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.तर इंटरला १.८० लाखांहून अधिक बसले होते. सीए परीक्षेत जुना व नवा म्हणून दोन वेगळे गट आहेत.त्यासाठी वेगवेगळ्या तारखांना परीक्षा घेण्यात आल्या होत्या.निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी icai.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.निकालाच्या लिंक वर क्लिक करा.तपशील सादर करावे.निकाल तपासून त्याची प्रिंट आउट काढावी.