वर्धा: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया या संस्थेने सी ए फाउंडेशन या परीक्षेच्या या वर्षीच्या तारखात बदल केला आहे. या परीक्षा २४,२६,२८,३० डिसेंबर रोजी होणार होत्या. त्या आता ३१ डिसेंबर २०२३ तसेच २,४,६ जानेवारी २०२४ रोजी होणार. सीए इंटरमिडीएट साठी गट एक ची परीक्षा २,४,६,८ नोव्हेंबरला घेतली जाईल. तर गट दोनची परीक्षा १०,१३,१५,१७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संस्थेने ५ जुलै रोजी आधीचे वेळापत्रक जाहीर केले होते. पण काही कारणास्तव परीक्षेच्या तारखा बदलत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी पुढील माहितीसाठी वेबसाईट वारंवार तपासत राहावी, असे पत्रकात म्हटले आहे. १ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या इंटर मिजिएट् , फायनल व पी क्यू सी परीक्षांत कोणताही बदल झाला नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले.