यवतमाळ : काचेमुळे एका गोऱ्ह्याची जीभ कापल्या गेली होती. दरम्यान पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून या गोऱ्ह्याची जीभ पुन्हा जोडली. ही शस्त्रक्रिया पशू वैद्यकीय क्षेत्रात मोठी उपलब्धी ठरली आहे.

जिल्हा सर्व पशुचिकित्सालय यवतमाळ येथे विविध प्रकारच्या रोगांचे निदान करून उपचार केले जातात. नुकतेच यवतमाळ तालुक्यातील कार्ली येथील राजेश एखणार यांचा दोन वर्षांच्या गोऱ्ह्यास काचेच्या बॉटमलमुळे जीभ कापल्याने यवतमाळच्या दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. येथील पशू वैद्यकीय अधिकारी गोपाल चव्हाण व त्यांचे सहाय्यक प्रणव माने यांनी पाहणी करून गोऱ्ह्याची जीभ ९५ टक्के कापली गेल्याचे सांगितले. जीभ बाहेरच्या बाजूला लटकलेली होती. जिभेच्या खालच्या भागात कापलेल्या जीभेचा थोडा हिस्सा जोडून होता. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पशुधपालक व पशुवैद्यक दोघांच्या विचाराने शस्त्रक्रिया करण्यासाठी तयारी करण्यात आली. तब्बल दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये जिभेला वरच्या व खालच्या बाजूला टाके देऊन जीभ जोडण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मोठी कसरत होती. त्याकरिता पशुपालक राजेश एखनर यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळल्या. डॉ. गोपाल चव्हाण व प्रणव माने यांनी तब्बल १० दिवस कार्ली येथे जाऊन या जनावरास सलाईन देत उपचार केले. आपल्या गोऱ्ह्याचा एक प्रकारचा पुनर्जन्म झाला असे एखणार म्हणाले.

Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
painted stork death loksatta news
नागपुरात नायलॉन मांजाचा पहिला बळी…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…

हेही वाचा – गोंदिया : नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला

डॉ. गोपाल उल्हास चव्हाण हे हिवरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी या पदावर कार्यरत असून जिल्हा सर्व पशुचिकित्सालय यवतमाळ येथे अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत. त्यांनी गेल्या दीड वर्षात १५० वर पशूंवर विविध शस्त्रक्रिया करून जीवदान दिले.

हेही वाचा – वाशिम : …अन् ‘त्या’ चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, जिल्हाधिकारीही झाल्या भावूक!

काचेच्या बॉटल जनावरांसाठी घातक

कुठल्याही काचेच्या बॉटल, वस्तू उघड्यावर न फेकता त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. अशा बॉटलमुळे जनावरांना इजा पोहोचू शकते. या बॉटल घातक आहेत. मुक्या प्राण्यांच्या जिवाची हानी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे, असे पशुधन विकास अधिकारी डॉ. गोपाल चव्हाण म्हणाले.

Story img Loader