लोकसत्ता टीम
नागपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांना आता पाणवठ्यातील पाणी नको तर ‘बिसलेरी’चे पाणी त्यांची तहान भागवत आहेत. या व्याघ्रप्रकल्पातील नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात ‘बबली’ या वाघिणीचे बछडे ‘बिसलेरी’च्या बाटलीशी खेळताना आढळले आहेत. मुंबई येथील प्रख्यात डॉक्टर राहूल महादार यांनी ही छायाचित्र त्यांच्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. त्यामुळे वन्यजीवांना निर्माण होत असलेल्या प्लास्टिकच्या धोक्याची चिंता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे ताडोबा प्रशासनाच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘बबली’ या वाघिणीने तिच्या बछड्यांसाठी शिकार केली, पण ही शिकार सोडून हे दोन्ही बछडे पर्यटकांनी टाकलेल्या ‘बिसलेरी’च्या बाटलीशी खेळण्यात रमले. एकाने ती बाटली तोंडात पकडली, तर दुसरा ती त्याच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न करु लागला. बराचवेळ चाललेल्या या खेळात ते दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. या संपूर्ण प्रकरणात ती प्लास्टिकची बाटली त्यांनी अक्षरश: चघळली. कुतूहलापोटी ते हे करत होते, पण ही बाब अतिशय गंभीर असल्याचे डॉ. राहूल महादार म्हणाले.
जगभरातील पर्यटक व्याघ्रदर्शनासाठी ताडोबात येत आहेत, पण महसूलाच्या मागे धावतानाच व्यवस्थापनाला पर्यटकांना शिस्त लावता आली नाही. वाघांनी प्लास्टिक चघळणे ही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वी देखील डिसेंबर २०२० मध्ये ‘जुनाबाई’ या वाघिणीचे उप-प्रौढ बछडे प्लास्टिकच्या पिशवीशी खेळताना पर्यटकांनी छायाचित्र टिपली होती. तर त्यानंतर सांबर हा प्राणी प्लास्टिकची पिशवी चघळताना आढळून आला. तर जानेवारी २०२१ मध्ये अलिझंझा या बफर क्षेत्रातच वाघिणीचा बछडा प्लास्टिकची बाटली उचलत असतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.