नागपूर : महावितरणने ऐन गणेशोत्सवात उपराजधानीतील इंदोरा, लष्करीबाग, जरीपटका, नारा, कामठी इत्यादी भागात सोमवारी वीज चोरी विरोधात मोहिम राबवली. त्यात तब्बल ६१ जणांना चोरी करतांना पकडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.महावितरणच्या कारवाईसाठी नागपूर शहर मंडळातील अभियंते, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागपूर शहर, गोंदिया व चंद्रपूर येथील भरारी पथकांनाही पाचारण करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी महावितरणचे विविध भरारी पथके सिव्हिल लाईन्स विभाग अंतर्गत येणाऱ्या इंदोरा, लष्करीबाग, जरीपटका, नारा, कामठी रोड, गोंडपुरा, बारसे नगर, पाचपावली, लुम्बिनी नगर, हमीद नगर, योगी अरविंद नगर, दीक्षित नगर, कामगार नगर व दीपक नगर इत्यादी भागात पोहचले. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती.

हेही वाचा : विदर्भात करोनाच्या बीए २.७५ उपप्रकाराचे रुग्ण अधिक ; नागपुरात १०६ रुग्ण आढळले

दरम्यान, पथकांना आकस्मिक तपासणीत ६१ वीज चोऱ्या निदर्शनात आल्या. या सगळ्यांवर कारवाई करण्यात आली.ही मोहीम मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांच्या नेतृत्वात राबवली गेली. या मोहिमेत प्रशांत टेम्भेकर, मदन नानोटकर, प्रसन्ना श्रीवास्तव, निलेश भगत यांच्यासह इतरही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.