नागपूर: नागपूर शहरातील विविध भागातील जलकुंभ सफाईची मोहीम महापालिकेने सुरू केली असून त्यासाठी विविध भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.
गुरुवारी ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला लकडगंज झोन परिसरातील जलकुंभ स्वच्छ केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी जुनी मंगळवारी, भुजाडे मोहल्ला, चिचघरे मोहल्ला, स्वीपर कॉलनी, माटाघरे मोहल्ला, मट्टीपुरा, हत्तीनाला, गरोबा मैदान, दिघोरीकर स्क्वेअर, कापसे स्क्वेअर, धवडे मोहल्ला, माटे स्क्वेअर, चापघरे, नागरनगर, जुगारनगर, नागरगाव बजरंग नगर, गुजर नगर, कुंभारटोली आदी वस्त्यांना पाणी पुरवठा केला जाणार नाही.
हेही वाचा… राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता
तसेच शुक्रवारी सतरंजीपरा, गंगाजमुना, रामपेठ, बुद्धपुरा, कुंभारपुरा, लकडगंज ले-आऊट, एव्हीजी लेआउट, सतनामी नगर, शौ मोहल्ला, भगवती नगर, छोटा कारखाना क्षेत्र, भाऊराव नगर, धनगंज स्वीपर नगर, चाकरनगर आदी वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही.
स्वच्छता कशासाठी?
जलकुंभ स्वच्छता पाण्याच्या गुणवत्तेची मानके राखण्यासाठी आणि उल्लेख केलेल्या भागात अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केली जाते, असे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे.