चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२ कोटी ९० लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम जोरात राबवण्यात येत आहे.
चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा एकत्रित चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडून १३ कोटी ६८ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडून ४ कोटी १२ लाख येणे आहे, औद्योगिक ग्राहकांकडून ६ कोटी ६३ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ४३ लाख, तर ग्रामीण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०८ कोटी ३१ लाख येणे आहेत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेऊन ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण थकबाकी – १२८ कोटी ९६ लाख
ग्राहकांची वर्गवारी :
घरगुती – ९ कोटी ४२ लाख, वाणिज्य – ३ कोटी ६६ लाख, औद्योगिक – ५ कोटी ३८ लाख, पथदिवे – १०५ कोटी ४३ लाख, पाणीपुरवठा योजना – ३ कोटी १२ इतर व सरकारी कार्यालये – १ कोटी ९४ लाख, अशी एकूण- १२८ कोटी ९६ लाख.
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण थकबाकी – ११३ कोटी ९४ लाख
ग्राहकांची वर्गवारी :
घरगुती – ४ कोटी २५ लाख, वाणिज्य – ४६ लाख, औद्योगिक – १ कोटी ३६ लाख, पथदिवे – १०२ कोटी ४७ लाख, पाणीपुरवठा योजना – ३० लाख, इतर व सरकारी कार्यालये – ४ कोटी ६९ लाख, अशी एकूण- ११३ कोटी ९४ लाख.