लोकसता टीम

नागपूर : नागपूर लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून वारंवार नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. त्याचीच प्रचिती आज नागपूरकरांनी मतदानाच्या दिवशी अनुभवली. मतदान केंद्राबाहेरच भाजपच्या बुथमधून लोकांचे नाव मतदार यादीत शोधून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या हाती पावती देण्यात येत होती. या पावतीवर भाजपच्या कमळ चिन्ह छापून होते. यासह भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचा छायाचित्रही छापून होता. या पावतीवर कहो “दिल से नितीनजी फिर से” असे लिहीलेले होते. या संदर्भात इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Conflict in Mahayuti over post of Guardian Minister of Raigad aditi tatkare bharat gogawale
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष
शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद
Changes in the One State One Uniform scheme Nagpur news
गणवेश शाळांमार्फतच! ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत बदल; जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे
MLA Randhir Savarkar appointed as BJPs chief spokesperson in legislature
अकोला : मंत्रिपदाची संधी हुकली, मात्र पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
BJP MLA suresh dhas, pankaja munde,
भाजप आमदार स्पष्टच बोलले, म्हणाले पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही
nana patole loksatta news
महाराष्ट्राचे ‘कमलनाथ’?

उत्तर नागपुरात मतदान यंत्राची संथ गती

उत्तर नागपुरात अनेक मतदान केंद्रांवर भर उन्हात मतदार रांगेत लागलेले असतानाही खूप हळू हळू वोटींग सुरु असल्याची तक्रार मिळताच काँग्रेस प्रतिनीधींनी पडताळणी केली असता बुथ क्रमांक २११,२१६,३४३ सह अनेक ठिकाणी स्लो वोटिंग सुरु होती.

आणखी वाचा-‘चरा चरात वास करणारी गुरुदेव शक्ती’ पंतप्रधान नरेंद्र मोदी असे का म्हणाले…

हजारो मतदार मतदानापासून वंचित

जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका शहरातील हजारो मतदारांना बसला आहे. शहरातील अनेक मतदान केंद्रावर मतदान कार्ड असणाऱ्यांची नावेच मतदार यादीतून प्रशासनाने डिलीट केल्याने हजारो मतदार मतदानापासून वंचित राहीले. उमेदवारांच्या प्रतिनीधींना दिलेल्या मतदार यादीत या मतदारांची नावे होती. मात्र मतदान केंद्रावर या मतदारांच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारलेला होता, हे विशेष. या संदर्भात इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

अनेकांकडून मतदान करताना शुटींग

सामान्य नागरिकांसाठी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. तसेच मोबाईल बाहेर ठेवा अशा सूचना देण्यात येत होत्या. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर जाताना, यादीवर सही करताना, तसेच मतदान केल्याचे बटन दाबतानाचे आणि VVPAT चेही शुटींग केलं. त्यामुळे नियम फक्त सामान्यांसाठीच असतो का, असा सवालही नागरिकांची उपस्थित केला. यासह अनेक मतदान केंद्राच्या आतमध्ये भाजपचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने प्रचारही करत होते.

Story img Loader