महाविकास आघाडीच्या काळात सर्व नेत्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायतमध्ये नियमबाह्य वॉर्ड व प्रभागरचना केल्या. हजारो हरकती, सूचना डावलून स्वतःचे उमेदवार कसे निवडून येतील, अशा प्रभागरचना करण्यात आल्या. या चुकीच्या प्रभागरचनांची समीक्षा करावी, पुन्हा प्रभागरचना कराव्या, नंतरच निवडणुका घ्याव्या, अशी मागणी माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

प्रभागरचनेमध्ये दुरुस्तीशिवाय निवडणूक घेऊ नये, सूचना, हरकतीचा विचार करून प्रभागरचना, गट गणाची रचना करावी, असे बावनकुळे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घ्याव्या, अन्यथा त्या राजकीय होतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत गट, गण करताना चुकीच्या गावांचा समावेश करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने चुकीच्या पद्धतीने तयार केलेली प्रभाग रचना तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली.