वाशिम: वनविभागासह विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. परंतु, त्यासाठीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली असून, भरती प्रक्रियेत शासन मालामाल तर बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत. यामुळे विद्यार्थी वर्गात तीव्र रोष व्यक्त केला जात असून वाढीव शुल्क रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे संभाजी ब्रिगेड व विद्यार्थ्यांनी निवेदाद्वारे केली आहे.
राज्यात मोठ्या अवधीनंतर राज्य सरकारकडून विविध विभागांतील रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येत आहेत. यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे कंत्राट राज्य शासनाने कंपन्यांना दिले आहे. परंतु, या कंपन्यांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क केले आहे.
हेही वाचा… अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शनिवारी
आधीच रोजगार नसलेल्या विद्यार्थ्यांना ९०० रुपयाचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यामुळेच परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे इस्माईल खान पठाण, अर्जुन पाटील खरात, अजय मैंदकर, सिमा बोखरे, पार्वती भगत यांच्या सह सुशिक्षित बेरोजगारांकडून करण्यात आली आहे.