लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्रासह तिघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. हा अपघात भातकुली नजीक सोमवारी रात्री घडला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कलीम खान सलीम खान (३६), सलीम खान मेहमूद खान (६५) आणि रुबिना परवीन कलीम खान (३२) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत.
आणखी वाचा-गडचिरोली : २८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
कलीम खान हे आपल्या कुटुंबीयांसमवेत अकोला येथून अमरावतीकडे येत होते. भातकुलीनजीक त्यांच्या कारचा टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही क्षणात कार अनियंत्रित होऊन उलटली. अपघात एवढा भीषण होता की कार तीन ते चार वेळा उलटून रस्त्याच्या कडेला शेतात शिरली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची सूचना पोलिसांना देण्यात आली. रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.