वाशीममध्ये माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात होऊन अपघातग्रस्त कार २०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी घडली. मृत तिन्ही प्रवासी वाशीम जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सविस्तर वृत्त असे की, वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला.

हेही वाचा : पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एनआयबीएम रस्त्यावर अपघात

या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला हे सर्व मृतक वाशीम जिल्ह्यातील आहेत. रोशन गाडे, प्रवीण सरकटे व रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car accident in tamhini ghat on mangaon pune highway in washim many dead pbs