भरधाव कार ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात यवतमाळचे दोघे ठार तर दोन गंभीर जखमी झाले. वर्धा नागपूर मार्गावर केळझर येथे बुधवारी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यवतमाळचे आदेश खुनकर व गजानन सरदार हे एम. एच. २९ बिव्ही ९५९७ क्रमांकाच्या कारने नागपूरवरून यवतमाळच्या दिशेने भरधाव वेगात जात होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : गडचिरोली : ‘नीट’ परीक्षेत अपयशाच्या भीतीपोटी विद्यार्थ्याची आत्महत्या
दरम्यान, केळझर परिसरात कारने समोर असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यात कार चालक आदेश खुनकर व गजानन सरदार जागीच ठार झाले. दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील वडगावचे रहिवासी होते. अपघातातील जखमींना सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने कार वेगात असल्याचे सांगितल्या जाते. सिंदी पोलीस पुढील तपास करीत आहे.
First published on: 01-09-2022 at 09:52 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car and truck accident both were killed on the spot in kelzar tmb 01