नागपूर-मुंबई महामार्गावरील पांगरी कुटे जवळ कार आणि ट्रकच्या धडकेत माय लेकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये कारमधील दोघे गंभीर झाले आहेत. नागपूर-मुंबई महामार्गावरील पांगरी कुटे ते डोंगरकिन्ही दरम्यान कार क्रमांक एमएच ४६ ए क्यू ३०८९ व ट्रक क्रमांक एमएच २८ ए बी ८२१८ ची विरुद्ध दिशेने जात असताना जोरदार धडक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामध्ये कारचा चुराडा झाला असून कारमधील चोपडे परिवारातील १३ वर्षीय मुलगा व ३५ वर्षीय आईचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून नागपूर मुंबई महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.