नागपूर : मृत्यूच्या वाटेवर असतांनाही आयुष्य वाचवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करतो. ही धडपड माणूसच करत नाही, तर प्राण्यांमध्ये ती आणखी जास्त असते. मांसभक्षी प्राण्यांना शिकार केल्याशिवाय पोट भरता येत नाही आणि वाघापेक्षाही सराईत शिकारी म्हणून रानकुत्रे ओळखले जातात. रानकुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या सांबराची आयुष्याशी चाललेली अशीच एक लढाई टिपली आहे, वन्यजीवप्रेमी अरविंद बंडा यांनी.
हेही वाचा >>> नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ३० लाखांचे आव्हान स्वीकारले पण…
VIDEO :
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील देवाडा-अडेगाव झोनमध्ये रानकुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या सांबराची आयुष्याशी लढाई चालली होती. रानकुत्रे कळपाने शिकार करतात आणि एकदा का त्यांच्या तावडीत कुणी सापडला तर मग त्याला मृत्यूच्या दारीच जावे लागते. या सांबराचे देखील असेच झाले. जंगलापासून आयुष्य आणि मृत्यूच्या मध्ये चाललेली ही लढाई शेवटी पाण्यापर्यंत येऊन थांबली. अरविंद बंडा यांनी लोकसत्तासोबत हा व्हिडिओ शेअर केला.