बुलढाणा : जिल्हा काँग्रेसतर्फे शुक्रवारी केंद्र आणि राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराविरुध्द जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुलढाणा शहरात चिखलफेक आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष यांच्यासह एकूण सत्तावीस पदाधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार उमेश भास्कर घुबे (वय ३७) यांनी यासंदर्भात बुलढाणा पोलिसांकडे तक्रार केली. यावरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सत्तावीस पदाधिकारी विरोधात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये चिखली विधानसभेचे माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष राहुल बोद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड , ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे , प्राध्यापक संतोष आंबेकर , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश रामभाउ अवचार, संजय पाढरे , अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद बंडवाल, एनएसयुआय चे जिल्हा अध्यक्ष शैलेश खेडेकर , प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे , शैलेश सावजी , अब्दुल जहीर अब्दुल जब्वार, जिल्हा सरचिटणीस सतीश मेहेंद्रे यांचा समावेश आहे त्यांच्यासह इतर पंधरा कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा