नागपूर : तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर हिसंक आंदोलन पेटले. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. नागपुरातही अनेक ठिकाणी आंदोलने झालीत. अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याचा खटला आता तब्बल ३८ वर्षांनंंतर चालवण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – श्रीरामाच्या पुतळ्याला तिरंगा अर्पण, हाती दिले संविधान; नाशकातील वेदोक्त प्रकरणाचा अभिनव निषेध

हेही वाचा – वादाचे दुसरे नाव काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे!

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नागपुरात शहर काँग्रेस, तसेच युवक काँग्रेसने आंदोलन केले. आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात युवक काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष, माजी आमदार अशोक धवड, माजी आमदार यशवंत बाजीराव, सुधाकर तिडके, चंदू रहाटे, नरेंद्र इंगळे, गिरीश ढाले आणि विनोद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण हा खटला अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता त्यावर सुनावणी होत आहे. रहाटे, ढाले आणि वल्ली यांचे निधन झाले आहे. धवड, बाजीराव, तिडके आणि इंगळे यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीला १ एप्रिल २०२३ ला सुरुवात झाली आहे. पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against congress leaders after 38 years regarding protest rbt 74 ssb