बुलढाणा : तरुणाईसह वयोवृद्धांनाही वेड लावणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’वर तलवारीसह स्वत:चे छायाचित्र ठेवणे जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकाला भलतेच महागात पडले. पोलिसांनी नगरसेवकाविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. भारत ऊर्फ बिट्या प्रकाश बावस्कर, असे या आरोपी नगरसेवकाचे नाव. तो बजरंग दलाचा पदाधिकारी असून गोरक्षा विभाग प्रमुखदेखील आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
गोपनीय विभागाचे पोलीस जमादार मनीष वानखडे यांना नगरसेवक बावस्कर याचे ‘व्हॉट्सॲप स्टेटस’वरील छायाचित्र निदर्शनास आले. त्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. वानखडे यांच्या फिर्यादीवरून बावस्करविरुद्ध शस्त्र कायद्यातील कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवकाच्या या कारनाम्याची नगरपंचायत वर्तुळासह संग्रामपूर तालुक्यात खमंग चर्चा होत आहे.
First published on: 29-08-2022 at 19:41 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against corporator for keeping photo with sword on whatsapp status zws