लोकसत्ता टीम

नागपूर : मेडिकलमध्ये बनावट औषधीचा पुरवठा केल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. तसेच या बनावट औषधीचे सेवन करणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीची चार कंपन्यांचे साटेलोटे असल्याचे उघडकीस आले आहे. अजनी पोलीस ठाण्यात अखेर चारही कंपनीचे मालक व संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप

या प्रकरणात पोलिसांनी कोल्हापूरमधील विशाल एन्टरप्रायझेसचा संचालक सुरेश दत्तात्रय पाटील, गुजरातमधील सूरत येथील फार्मासिक्स बायोटेकची मालक प्रीती सुमित त्रिवेदी, भिवंडीतील ॲक्वेंटीस बायोटेकचा मालक मिहीर त्रिवेदी, मिरा रोड, ठाणे येथील काबिज जेनेरिक हाऊसचा मालक विजय शैलेंद्र चौधरी व एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या ‘एफडीए’ने नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या औषधी भांडारातील बनावट औषधीचा उलगडा केला. अॅण्टीबायोटिक असलेली ‘रेसीफ-५००’ नावाच्या औषधीत ‘सिप्रोफ्लोक्सासिन’नावाची औषधीच नसल्याचे तपासणीत आढळून आले.

आणखी वाचा-बुलढाणा : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह ‘पोस्ट’! युवक सत्ताधारी पक्षाचा…

गुजरात येथील ‘रिफायंड फार्मा’ नावाच्या या कंपनीचे हे औषध असले तरी ही कंपनी अस्तित्वातच नसल्याची बाब चौकशीतून समोर आले. या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी याच महिन्यात सहा जणांना अटक केली होती. हे प्रकरण ताजे असताना ‘एफडीए’च्या तपासणीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधी भांडारातून ‘रिक्लॅव्ह ६२५’ या अॅण्टीबायोटिक औषधी बनावट निघाल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे औषधी निरीक्षक नितीन भांडारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात कलम २७६, ३४, ४२०, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीचा असा होता त्रिकोण

तीनही औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांना बनावट औषधीबाबत माहिती होती. काबिज जेनेरिक हाऊसकडून बाजारातून हे बनावट औषध खरेदी करण्यात आले होते. त्यांनी जुलै महिन्यातच ॲक्वेंटीस बायोटेकला विक्री केली. तर ॲक्वेंटीसने ही औषधे फार्मासिक्स बायोटेकला विकली. फार्मासिक्स बायोटेककडून कोल्हापुरमधील विशाल एन्टरप्रायजेसने औषधे खरेदी केली होती. त्याच औषधांचा मेडिकलमध्ये पुरवठा करण्यात आला.

आणखी वाचा-चंद्रपूर : धक्कादायक! ‘बीएएमएस’च्या विद्यार्थिनीचा वसतिगृहात झोपेतच मृत्यू…

आरोपी वाढण्याची शक्यता

या बनावट औषधी प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रॅकेटमधील मिहीर त्रिवेदी व विजय शैलेंद्र चौधरी या आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. चौधरीविरोधात कळमेश्वरसोबतच भिवंडी, नांदेड व वर्धा येथेदेखील गुन्हे दाखल आहेत. तर त्रिवेदीदेखील त्याच प्रकरणात आरोपी होता व त्यालादेखील पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींची नागपूर पोलिसांकडून लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.