अमरावती : अचलपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित धर्मसभेमध्ये दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे व सागर बेग यांच्याविरुद्ध सोमवारी (३० सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला.

शक्ती फाउंडेशन, परतवाडातर्फे २९ सप्टेंबर रोजी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नितेश राणे व सागर बेग यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत नितेश राणे व सागर बेग यांनी आपल्या भाषणात मुस्लीम धर्मियांबद्दल हिंदू समाजामध्ये जातीय व धार्मिक द्वेष निर्माण होऊन एकमेकांविरुद्ध कटू भावना वाढविण्याचा प्रयत्न केल्याबाबत इमरान खान असलम खान (२८) यांनी अचलपूर ठाण्यात तक्रार दाखल केली.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा
Alandi, Kalas village, rime News
आळंदी रस्त्यावरील कळस गावात दोन गटात हाणामारी
Salman Khan Threatened Indira Krishnan
‘तेरे नाम’ चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला दिली होती धमकी; म्हणाला, “मी मोठा तमाशा….”
Madhuri Dixit And Kartik Aryan dance at promotion of Bhool Bhulaiyaa 3 movie
Video: ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हे ही वाचा…भाच्याला मोबाईल गिफ्ट दिला आणि चोरीचा उलगडा झाला

तक्रारीच्या अनुषंगाने नितेश राणे व सागर बेग यांनी धर्माच्या कारणावरुन समाजातील निरनिराळ्या गटांमध्ये एकोपा टिकविण्यास बाधक व शत्रुत्व वाढण्यास पूरक अशी कृती केल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १९६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अचलपूर पोलीस करीत आहे.

समाज माध्यमांवर शेरेबाजी

धर्मसभेपूर्वी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शहरातून बाइक रॅली काढण्यात आली. ही रॅली समाज माध्यमांवर लाइव्ह सुरू होती. त्यावेळी काहींनी अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशा शब्दांमध्ये शेरेबाजी केल्याची व त्याचे स्क्रीनशॉट समाज माध्यम प्लॅटफार्मवर प्रसारित केल्याची तक्रार शेख जमीर शेख जिलानी (४०) यांनी परतवाडा ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून चार आयडी धारकांविरुद्ध कलम २९९ भारतीय न्याय संहिते अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांकडून संबंधित आयडी धारकांची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

हे ही वाचा…नागपूर हिट अँन्ड रन: रितिका मालूला मध्यरात्री अटक, सत्र न्यायालयाकडून दखल, स्वत:हून याचिका…

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित किंवा फॉरवर्ड करु नये. अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे. -विशाल आनंद, पोलीस अधीक्षक