लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : तमाशाचा फड उभारताना विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर तमाशा मंडळाच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज, गुरुवारी संध्याकाळी उशिरा धामणगाव बढे पोलिसांनी सदोष मनुष्यवधासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-पालकमंत्री जिल्ह्यात, शेतकरी तलावात! अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे जलसमाधी आंदोलन

मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील कान्हू सती यात्रेत काल बुधवारी ही दुर्घटना घडली होती. तमाशाचा फड उभारताना हातातील लोखंडी पाईपचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे अंकुश अनिल वारुळे (रा.नारायणगांव, ता. जुन्नर, जि. पुणे), विशाल भोसले (रा. राजुर गणपती, ता. भोकरदन, जि. जालना) या दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. तसेच राहुल शंकर जाधव (मुंबई) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी आनंद लोकनाट्य तमाशा मंडळाचे मालक मयुर संजय महाजन (रा.जळगाव खान्देश), चालक सुलेमान साहेबलाल अत्तार (रा.सांगली), व्यवस्थापक संपत शेळके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been registered against the owner of the tamasha mandal scm 61 mrj