लोकसत्ता टीम
नागपूर : घरकामासाठी विकत घेतलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगरेटचे चटके देऊन दोघांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले आहे. त्या पीडित मुलीवर सख्ख्या २२ वर्षीय भावानेही अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक सत्य समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भावाला बंगळुरूमधून अटक केली.
आरोपी तहा अरमान खान आणि मेहुणा अझहर शेख यांनी घरकाम करणाऱ्या मुलीच्या गुप्तांग आणि छातीला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार केला. तर हिना खानने मुलीच्या पाठीला आणि पोटाला गरम तव्याने चटके देऊन छळ केला. अरमान, हिना आणि अझहर बेंगळुरूला निघून गेल्यानंतर शेजाऱ्यांमुळे हे प्रकरण उघडकीस आले. हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींना व्हिआयपी वागणूक दिल्यामुळे हे प्रकरण अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे तपासासाठी आले आहे.
आणखी वाचा-नागपूर: गंगाजमुनात १५ वर्षीय मुलीकडून देहव्यापार
तपासात पीडित मुलीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. सख्खा मोठा भाऊ वारंवार बलात्कार करीत होता. तो एका चिकन विक्रेत्याकडे कामाला आहे. घरात कुणी नसताना तो तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तिने ही बाब अनेकदा वडिलांना सांगितली. मात्र, वडिलाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लैंगिक शोषणासह मारहाणही मुलीला सहन करावी लागत होती. वडिलांनी तिला अरमान खान आणि हिना खान यांनी मुलीला ५० हजारांत विकल्यानंतर ती आगीतून फुफाट्यात सापडली.
सख्ख्या भावानंतर आता तिच्यावर दोघेजण अन्वयीत छळ करून लैंगिक शोषण करीत होते. आता मुलीच्या भावाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ५ दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आणखी वाचा-लॉजवर नेऊन गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
हिना अजूनही फरारच
मुलीला तव्याने चटके देणारी हिना ही अजुनही फरार आहे. हुडकेश्वर पोलिसांच्या आशिर्वादाने हिनाला सूट मिळाली होती तर आरोपींना हॉटेलचे जेवन आणि बोलायला फोन मिळाला होता. हिनाला अटक करण्यासाठी हुडकेश्वर पोलिसांनी ‘अर्थपूर्ण’ टाळाटाळ केली होती. हिना खान ही अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात गेल्याची माहिती आहे.