पत्नीवर असलेल्या संतापाचा राग पोटच्या पोरावर काढण्याची अजब तेवढीच संतापजनक घटना पंचक्रोशीत खळबळ माजवून गेली.झाले असे की आष्टी येथील खडकपुरा येथील शिवानी राजेंद्र सोनोने यांचे दुसरे लग्न अकरा महिन्याआधी गावातीलच राजेंद्र सोनोणे यांच्याशी झाले होते.पहिल्या पती पासून झालेला तीन वर्षीय शिवांश सोबतच होता.
हेही वाचा >>> अकोला : ट्रक उलटला अन् मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा जीव गेला
दुसरा पती राजेंद्र याच्याशी दारू पिण्या वरून वाद झाला.वाद पाहून त्यावेळी घरी आलेल्या शिवानी यांच्या आईने मुलगा शिवंश यास सोबत घरी नेले.काही दिवसांनी आई मुलास घेवून आली.मुलाची व आईची प्रकृती बिघडल्याने शिवानी मुलास आर्वी येथे कोल्हे हॉस्पिटल मध्ये दाखल झाले.दुसऱ्या दिवशी पती राजेंद्र दवाखान्यात आला. वाद सुरू केला.दवाखान्यात खूप खर्च होत आहे म्हणून शिवीगाळ केली.दोघात चांगलाच वाद घडला. त्यावेळी संतापून पती राजेंद्र याने मुलगा शिवांश यास जवळ घेतले.लगेच सिमेंट लादीवर जोरात ढकलले.त्यात मुलास डोळा,हात व कंबरेला जबर जखम झाली. मुलावर उपचार सुरू आहे, असे नमूद करीत आई शिवानी सोनोने यांनी आष्टी पोलीसांकडे तक्रार दाखल केली.