गोंदिया : विवाहितेचा सासरच्या मंडळीं कडून कोणत्याही प्रकारे छळ होऊ नये यासाठी हुंडा विरोधात विविध कायदे सरकार द्वारे करण्यात आले आहे. तरी पण लोक यातून काही धडा घेतात असे दिसून येत नाहीत. असेच एक प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरी येथे घडले आले. विवाहितेला माहेरून पाच लाख रुपये आण
अन्यथा तुला माझ्या घरात राहू देणार नाही, असे म्हणत सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला . २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. या घटनेसंदर्भात गोरेगाव पोलिसात मंगळवार २५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरी येथे माहेर असलेली यास्मिन सादिक शेख (२७, रा. कोपे-चुलोद, ता. लालबर्रा, जि. बालाघाट -मध्य प्रदेश) हिचे लग्न ३० एप्रिल २०१७ रोजी सादिक शेख (३२) सोबत झाले होते. पती सादिक शेख हा तिला माहेरून हुंड्याच्या स्वरुपात पाच लाख रुपये आण, अशी मागणी करीत मारहाण व शिवीगाळ करीत असे. सासू जोहरा जमशेर शेख, भासरा आशिक जमशेर शेख (३५) व जाऊ शबनम आशिक शेख (२८) हे यास्मिनला पागल आहे, असे म्हणून नेहमी त्रास देत होते. या विषयाला घेऊन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाथरी येथे तंटामुक्त गाव समितीची सभा घेण्यात आली असता सादिक ने पंचांसमक्ष यास्मिनच्या वडिलांना मी तुमच्या मुलीला दवाखान्यात पैसे लावले, त्याचे पाच लाख रुपये द्या, तरच मी तुमच्या मुलीला घेऊन जाईन, असे सांगितले. त्यांचे प्रकरण गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल येथे गेले होते. परंतु, भरोसा सेलमध्ये तडजोड न झाल्याने सादिक शेख, जोहरा जमशेर शेख (६०), आशिक शेख व शबनम शेख (सर्व रा. कोपे चुलोद, ता. लालबर्रा, जि. बालाघाट मध्य प्रदेश) यांच्यावर गोरेगाव पोलिसात भा.न्या.सं. २०२३ कलम ८५, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पागल ठरवले
यास्मिन शेख हीला पागल म्हणून हिनावत सासरची मंडळी विवाहितेचा सतत छळ करत होती. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी यास्मिन शेख ही आपल्या पती सोबत गोंदिया येथे आली होती. उपचार करून तिला सादिकने ऑटोमध्ये बसवून पाथरी येथे पाठविले. मला काम आहे ते आटोपून पाथरी येथे परत येतो, असे सांगून तो निघून गेला व तिचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला.
दुसऱ्या मोबाइल वरून यास्मिन यांनी फोन केले असता त्याने तुझ्या आई-वडिलांनी तुला दवाखान्यात पैसे लावले नाहीत व हुंड्याचेही पैसे दिले नाहीत. त्यामुळे मी तुला घेऊन जात नाही. मी इस्तेमाह कमिटी, भंडारा येथे अर्ज केला आहे, तिथून तुला पत्र येणार आहे, असे सांगून त्याने फोन कट केला होता.