नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीमधून आरक्षण देण्याचा आग्रह मनोज जरांगे पाटील यांचा आहे, तर ओबीसीमधून आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी ओबीसी नेत्यांची आहे. या मुद्यांवरून आता जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये वैयक्तिक टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.

हिंगोली येथील ‘ओबीसी एल्गार मेळाव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांना लक्ष्य केले. तायवाडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याची तक्रार झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विकी भगवानराव उरेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – यवतमाळ : गांजा विक्री व सेवनप्रकरणी २२ वर्षांत प्रथमच ६९ कारवाया

दुसरीकडे, डॉ. तायवाडे यांना फोनवरुन धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतः तायवाडे यांनी याबाबत माहिती दिली असून आपण कोणत्याही धमक्यांना भीक घालत नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. माझे भाषण ऐकून काही जणांनी वेगळाच अर्थ काढला आहे. धमकी देताना तुम्ही असे बोललात तस बोललात असे मला त्यांनी सांगितले. पण मी त्यांना म्हटलं मी वाईट काय बोललो आहे, त्याचं रेकॉर्डिंग मला पाठवा. त्याशिवाय मी तुमच्याशी असे परस्पर बोलणार नाही. त्यांना धमकीचे फोन येत असल्याने त्यांची आज सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी एक बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा – भंडारा : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पहिल्या प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराबरोबर मिळून काढला काटा; त्रिशंकू प्रेमातून नयनची हत्या

ओबीसींच्या दुसऱ्या सभेत मनोज जरांगेंवर टीका करताना बबनराव तायवाडे म्हणाले होते की, “तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करता. आमच्या नेत्याला ( छगन भुजबळ ) शिवीगाळ करता. पण, त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आमच्या नेत्याकडे बघणाऱ्याचा डोळा काढण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. त्यामुळे कुणी तशी हिंमत करू नये. आमची लायकी काढत आहात. यांना आमची लायकी काढण्याचा अधिकार कुणी दिला? ओबीसी, एससी, एसटी या तीन जातींचा जरांगे-पाटील अपमान करत आहे. आमची लायकी नाही, तर आमच्या पंक्तीत कशासाठी येत आहात? लायकी काढण्याची हिंमत कराल, तर महाराष्ट्रात फिरणे बंद करू.” त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader