चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटल्याची प्रकरणे समोर आली आहे. कढोली गावात पैसे वाटणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून निवडणूक विभागाच्या पथकाच्या ताब्यात दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील कढोली गावात रात्रीपासून प्रति मतदार ५०० ते १००० रुपये देऊन मते विकत घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ही बाब काही ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

हेही वाचा – धक्कादायक! महाविद्यालयातील मुलींकडून बोगस मतदान करून घेण्याचा प्रयत्न, भाजपच्या उमेदवाराने…

पैसे वाटप करणाऱ्यांना पकडून निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले. कोरडे व हिंगणे असे पैसे वाटप करणाऱ्यांची नावे आहेत. दोघेही दुचाकीवरून पैसे वाटूत होते. ही रक्कम कोणासाठी वाटली जात होती, याचा तपास निवडणूक विभाग करत आहे. या संदर्भात राजुरा निवडणूक अधिकारी तथा एसडीओ रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात सरासरी ६५ टक्क्यांपर्यंत मतदान! मतदान केंद्राबाहेर रांगा; मतदार यंत्रात बिघाडी

मतदानासाठी आलेल्या मजुराचा अपघातात मृत्यू

मतदान करून मोटार सायकलवरून कामावर परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. सदर घटना आज, बुधवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या दरम्यान घडली. प्रभाकर बाबुराव मरस्कोळे (वय ४७, रा. खरमत गाव) असे मृत मजुराचे नाव आहे. तर मोहडा (रा.) रहिवाशी विलास बालाजी देरकर (४७) हे गंभीर जखमी आहेत. मयत प्रभाकर मरसकोळे हे विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी खरमत गावात आले होते. खरमत येथे मतदान करून चिंतलधाबा-पोंभुर्णा मार्गे मोटारसायकलने (क्रमांक एम.एच. ३४ जण सीबी ४७२४) जात होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases of distribution of money to voters have come to light in rajura assembly constituency villagers caught two people distributing money in kadholi village rsj 74 ssb