लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : मनसे जिल्हाध्यक्षासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका व्यापाऱ्याला मारहाण करून व धमकावून २ लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा-नागपूरच्या खचलेल्या पुलाची कहानी, दुरूस्तीला लागले तब्बल दीड वर्ष

चिखली येथे ही घटना घडली. आरोपींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उप जिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यासह १० ते १५ जणांचा समावेश आहे. चिखली ‘एमआयडीसी’ मधील तिरुपती जिनिंग व प्रेसिंग चे मालक गोविंद अग्रवाल यांना दमदाटी करून २ लाखांची खंडणी मागितली. तसेच पदाधिकारी व अन्य अनोळखी सुमारे १५ जणांनी लोटपाट करून हात पाय तोडण्याची धमकी दिली. तसेच ‘मनसे स्टाईल इंगा’ दाखविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.यावरून चिखली पोलिसांनी भादवीच्या कलम ३८५, ४४७, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases of extortion filed against mns district president and four officials scm 61 mrj
Show comments