अकोला : विविध पोलिस ठाण्यांतर्गत कारमधून गोवंशाची तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोट फैल येथील रहिवासी शेख अदनान शेख युसुफ कुरेशी याच्या मालकीच्या वाहनातून (क्र. एम. एच ०४ जीडी ०२२६) त्याचे साथीदार मोहम्मद रोशन शेख मुसा रा. मच्छी मार्केट, युसुफ खान रहीम खान रा. पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, मो. अबुजर मो. हनीफ कुरेशी रा. मोहम्मद जली रोड व शेख रेहान शेख रशीद रा. पिंजारी गल्ली या पाच जणांनी जिल्ह्याच्या विविध ठिकाणावरून गोवंशाच्या तस्करीचा मोठा धंदा सुरू केला होता.
या टोळीने मुतोजापूर, अकोट, उरळ, सिव्हिल लाइन्स, आकोट फैल, डाबकी रोड व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरांची तस्करी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या टोळीला अटक केल्यावर चौकशी करण्यात आली. त्यामध्ये १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींडून एक चारचाकी वाहन, दोन महागड्या दुचाक्या, दोन महागडे मोबाइल असा एकून ११.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणखी एक चारचाकी वाहन लपविण्यात आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या चोरट्यांना पुढील तपासासाठी सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा अन् शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईचा पेच निर्माण होणार?
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास भगत, पीएसआय गोपाल जाधव, गणेश पांडे, राजपालिसंह ठाकूर, दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, भास्कर धोत्रे, सुलतान पठान, रवि खंडारे, महेंद्र मलीये, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, अमोल दिपके, राहूल गायकवाड, सुमीत राठोड, स्वप्नील चौधरी, प्रशांत कमलाकर, मो. नफीस यांनी केली.