नागपूर : एका शाळेच्या निविदेसाठी १९.९६ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेशन विभागाने (सीबीआय) नागपूरसह देशातील सहा शहरात छापेमारी केली. या छाप्यात एका खासगी कंपनीच्या मालकासह ७ जणांना अटक केली. यामध्ये खासगी कंपनीच्या मालकासह ब्रीज अँड रुफ कंपनी (इंडिया) लिमीटेडचे मुख्य कार्यकारी संचालकांचा कार्यकारी सचिव आशिष राजदान याचाही समावेश आहे. अन्य आरोपींमध्ये एच.पी. राज्यगुरु (राजकोट) कंपनीचे मालक हेतलकुमार प्रवीणचंद्र राज्यगुरु, शशांकुमार जैन (कोलकाता), सोमेश चंद्र (नोएडा-उत्तरप्रदेश), वीर ठक्कर (मुंबई), राजीव रंजन (दिल्ली), तरंग अग्रवाल (दिल्ली) यांचा समावेश आहे.

नागपूर सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ओडीशातील एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाच्या (ईएमआरएस) कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत होती. यादरम्यान, वरील सर्व सातही आरोपींनी शाळेच्या कामाची निविदा मिळविण्यासाठी कट रचला. निविदा मिळविण्यासाठी ब्रीज अँड रुप कंपनीचा (इंडिया) लोकसेवक आशिष राजदान याने २० लाखांची लाच मागितली होती. ती लाचेची रक्कम हवालाच्या माध्यमातून देण्यात येणार होती. तक्रार प्राप्त होताच सीबीआयने नागपूर, मुंबई, दिल्ली, नोएडा, कोलकाता आणि राजकोट या शहरात छापेमारी केली.

50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक

हेही वाचा : “राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचा निर्णय भाजपाचा, शिवसेनेचा काही संबंध नाही”; अर्जुन खोतकरांचं विधान; म्हणाले, “आमची युती…”

या छाप्यात अनेक महत्वाचे दस्तावेज आणि २६.६० लाखांची रक्कम सीबीआयने जप्त केली. नागपुरातील नरेंद्रनगरातील एका शिक्षिकेच्या घरावर सीबीआयने मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत कारवाई केली. त्या शिक्षिकेचा पतीसुद्धा शाळेच्या निविदेसाठी १९.९६ लाखांची लाच घेतल्याप्रकरणात आरोपी आहे. त्यामुळे लाचेची रक्कम आणि काही दस्तावेज नागपुरातील घरात असल्याची माहिती दिल्ली सीबीआयला होती. शिक्षिकेच्या घरातून काही दस्तावेज, मोबाईल आणि लॅपटॉप सीबीआयने जप्त केला, हे विशेष.

Story img Loader