जागतिक कंपवात दिवस आज

कंपवात आजाराचा (पार्किंसन) परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होतो. ६५ वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला कंपवात असतो. वाढत्या वयोमानासह कंपवाताचेही रुग्ण वाढत आहेत. आज, ११ एप्रिल रोजी जागतिक कंपवात दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी’चे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले की, कंपवात हा एक मेंदूचा आजार आहे. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर परिणाम करतो. जगात सुमारे ९० लाख रुग्णांना या रोगाने ग्रासले आहे. भारतात या आजाराचे ८ ते ९ लाख रुग्ण आहे. दहा वर्षानंतर हे प्रमाण दुप्पट होईल. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. ४० वयोगटाखालील तरुणांमध्ये हा रोग दिसून येतो. जेव्हा हा रोग ४० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना होतो तेव्हा त्याला कंपवाताचा तरुण प्रारंभ म्हणतात. आणि ४० वर्षांपेक्षा कमी वयामधे किशोर कंपवात रोग म्हणतात

लक्षणे काय?

कंपवाताचे लक्षण म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. हा रोग शरीराच्या एका बाजूला सुरू होतो आणि नंतर पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. हात, पाय कडक होतात. पाठीचा कणा वाकतो. चालणे सुरू करण्यामध्ये अडचण होते. अचानक खाली पडण्याचे प्रकार दिसून येतात. लिहिताना अक्षरांचा आकार लहान होतो आणि अक्षर वेडेवाकडे होतात. सहीमध्ये बदल होतो. तोंडातून लाळ सांडत असते. झोप आणि संज्ञानात्मक क्षमतेमध्ये व्यत्यय येतो. वेदना आणि पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, चिंता आणि नैराश्य येते आणि जीवनाची गुणवत्ता कमी होते.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ

कंपवात आजाराची प्रारंभी लक्षणे ओळखली जात नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होते. या आजाराची कारणे स्पष्ट नाहीत. ८ ते १० टक्के रुग्णांमध्ये अनुवांशिक कारण असते. सोबत पर्यावरणीय घटक, वायू प्रदूषण काही रुग्णांमध्ये जबाबदार असू शकतात. दर्जेदार ‘न्यूरोलॉजिकल’ काळजी आणि उपचारामुळे कंपवाताच्या रुग्णांचे जीवन सुधारण्याचे प्रयत्न केले जात असून या आजाराबद्दल जनजागृतीची गरज आहे.- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी’चे विश्वस्त