जागतिक कंपवात दिवस आज
कंपवात आजाराचा (पार्किंसन) परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होतो. ६५ वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला कंपवात असतो. वाढत्या वयोमानासह कंपवाताचेही रुग्ण वाढत आहेत. आज, ११ एप्रिल रोजी जागतिक कंपवात दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी’चे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले की, कंपवात हा एक मेंदूचा आजार आहे. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर परिणाम करतो. जगात सुमारे ९० लाख रुग्णांना या रोगाने ग्रासले आहे. भारतात या आजाराचे ८ ते ९ लाख रुग्ण आहे. दहा वर्षानंतर हे प्रमाण दुप्पट होईल. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. ४० वयोगटाखालील तरुणांमध्ये हा रोग दिसून येतो. जेव्हा हा रोग ४० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना होतो तेव्हा त्याला कंपवाताचा तरुण प्रारंभ म्हणतात. आणि ४० वर्षांपेक्षा कमी वयामधे किशोर कंपवात रोग म्हणतात