नागपूर: शहरात चारही भागात मेट्रो सेवा सुरु असून मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रोने प्रवास करत आहे महामेट्रोच्या वतीने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ उपक्रम राबवला जात आहे. महामेट्रोने नागरिकांकरिता आणखी एक निर्णय घेत सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत रविवार दिवशी फक्त ३५००/- रुपये मध्ये एका तासाकरिता संपूर्ण मेट्रो ट्रेन बुक करू शकता. रविवारी सकाळी ६ ते दुपारी १ वाजता पर्यंत असून व अन्य दिवशी तसेच अन्य वेळेकरिता ५०००/- रुपये एवढे मोजावे लागतील.  

 गेल्या काही दिवसांमध्ये सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक संपूर्ण मेट्रो ट्रेन बुक करत वाढदिवस,लग्न वाढदिवस आदी कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. विशेष म्हणजे नागपूर शहराच्या बाहेरील जिल्ह्यातील गडचिरोली,चंद्रपूर,अमरावती या भागातून शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल देखील नियमित स्वरूपात येत असतात व याचा कल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

Story img Loader