वर्धा : आरोग्याबाबत शहरी भागात जागृती वाढली असली तरी प्रकृतीची हेळसांड करून घेणारे कमी नाही. ग्रामीण भागात अद्याप आरोग्यविषयक सोयी पुरेश्या नसल्याचे म्हटल्या जाते. परिणामी शरीराची काळजी घेण्याची बाब दुर्लक्षित होते. याच पार्श्वभूमीवर केंद्राच्या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या राष्ट्रीय आयोगाने आरोग्य तपासणीचा उपक्रम सुरू केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या या उपक्रमास २६ नोव्हेंबरपासून आरंभ झाला असून तो २५ डिसेंबरपर्यंत चालेल. या उपक्रमात मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आयुर्वेदिक सूत्रांनुसार नागरिकांच्या आरोग्याचे निरीक्षण होईल. पहिल्या टप्प्यात एक कोटी नागरिकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आरोग्य निरीक्षण स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळणार. नागरिकाची प्रकृती तपासून ती कश्या स्वरुपाची म्हणजे पित्त, वात वगैरे कश्या स्वरुपाची आहे, याचे मूल्यांकन केल्या जाणार. ते करण्यात आल्यावर संबंधित नागरिकांस वेळोवेळी आरोग्य विषयक खबरदारीचा सल्ला देण्यात येईल.

Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Maharashtra hospitals loksatta news
दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
how to make neem kadha for glowing skin
त्वचेच्या समस्येसाठी कडुलिंबाचा काढा आहे फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?

हेही वाचा – बुलढाणा : शंभर उमेदवार ‘क्लिन बोल्ड’, दारूण पराभव अन् ‘डिपॉझिट’ही गमावले

हा उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल, असा प्रयत्न आहे. उपक्रमात अधिकाधिक आरोग्य मूल्यांकन करणाऱ्या आयुर्वेद डॉक्टरांसाठी मानांकन मिळणार. चिकित्सा आयोगाच्या नोंदणी मंडळातर्फे अश्या डॉक्टरांना क्रेडिट पॉईंट दिल्या जातील. तसेच ज्या आयुर्वेद महाविद्यालयानी उपक्रमात उत्कृष कार्य केले आहे अश्या महाविद्यालयास खास मानांकन देण्यात येणार असून त्याची पद्धत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपूजारी यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘या’ मार्गावर धावणार अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या

देशभरातील आयुर्वेद शाखेचे प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, चिकित्सा अधिकारी या उपक्रमात सहभागी होत आहे. आरोग्य मूल्यांकन झालेल्या नागरिकांस आरोग्य कार्ड मिळणार. केव्हाही तो आजारी पडल्यास या कार्डच्या आधारावर त्याच्यावर आयुर्वेद उपचार कोणते करायचे याचा त्वरित निर्णय घेणे शक्य होईल. म्हणून या उपक्रमाचा अधिकाधिक प्रसार व्हावा, त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आयुर्वेदप्रेमी तसेच आरोग्य दुतांना करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आरोग्य मूल्यांकन करीत झाला. आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या उपक्रमाची माहिती देताना नमूद केले की आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक आहे.

Story img Loader