वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार. १ जानेवारी २०२४ पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. दहावीच्या मुख्य परीक्षा १९ फेब्रुवारी १३ मार्च दरम्यान तर बारावीच्या १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल २०२४ दरम्यान घेतल्या जातील. शिक्षण मंडळाने सर्व शाळांना प्रात्यक्षिक परिक्षेशी संबंधित आवश्यक बाबी तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
विद्यार्थी तसेच पालकांना परीक्षेबाबत माहिती देण्याचे निर्देश आहेत. जेणेकरून ते पूर्वतयारी करू शकतील.अपंग विद्यार्थ्यांसाठी शाळा इमारतीत योग्य ती रचना आवश्यक आहे. तसेच मंडळाने अन्य काही मार्गदर्शक सूचना सर्व शाळांना केल्या आहेत.