वर्धा : ऐतिहासिक स्थळे ही राष्ट्राची सांस्कृतिक संपदा व जतन करण्यासारखा वारसा समजली जातात. केंद्र शासनाचा भारतीय पुरातत्त्व विभाग खास हा वारसा जपण्यासाठी स्थापन झाला आहे. त्यांच्याकडे देशातील ३ हजार ६९६ अशी स्थळे जपण्याची व त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित १९ स्थळे जपण्याची जबाबदारी असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांना मिळाली आहे. त्यांच्या एका प्रश्नास उत्तर देताना केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या स्थळांची यादी दिली. यात पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, माहुली, अर्नाळा, अलिबाग, बिरवाडी, घोसाळगड, रोहा, कडसरी, अवचितगड, रायगड, तळा महाड, लखूजी जाधवराव समाधी सिंदखेडराजा, महादेव मंदिर सिंदखेडराजा या स्थळांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार जतन व संवर्धन कामे केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central maintenance of 19 sites related to chhatrapati shivaji maharaj pmd 64 ysh